छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस १ लाख ८० हजार रुपयाचा दंड आणि एक वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे.
आरोपी दिलीप भीमराव गणार (रा. राजनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) याने प्रदीप पांडुरंग देशमुख (रा. गारखेडा छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून जुन २०२० मध्ये आरोपीचा व्यवसाय वाढविण्यासाठी २ लाख मागणी केली होती. परंतु फिर्यादी प्रदीप पांडुरंग देशमुख यांच्याकडे मागितले होते. तेव्हा फिर्यादीकडे तेव्हढी रक्कम - उपलब्ध नसल्याने फिर्यादीने १ एक लाख रुपये हातउसने म्हणून दिले आणि ही रक्कम - २ महिन्याने परत करण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे - फिर्यादीने १ लाख रुपयाची मागणी केली तेव्हा आरोपीने - दिनांक १३ आक्टोबर २०२० रोजी फिर्यादीस रोख १० हजार रुपये आणि रु ९० हजारांचा - धनादेश (क्र. ०४५४५०) हा युनियन बँक औरंगाबाद
या नावाने दिला. आरोपीने सांगितल्या नुसार सदर धनादेश फिर्यादी प्रदीप पांडुरंग देशमुख यांनी त्यांचे खाते असलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँक शाखा औरंगाबाद येथे जमा केला. तेव्हा हा धनादेश अपुरी रक्कम या शेऱ्याने परत आला.
फिर्यादीने वकिलामार्फत धनादेशाची रक्कम देण्यास सांगितले परंतु आरोपी दिलीप भीमराव गणारने रकम देण्यास असमर्थता दाखवली. प्रस्तुत प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी औरंगाबाद (२रे न्यायालय) डॉ. ए. एस. भसारकर यांनी पूर्ण सुनावणी अंती २ मे रोजी निकाल दिला.
या प्रकरणात आरोपी दिलीप भीमराव गणारला एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा आणि रोख १ लाख ८० हजार रुपये एवढा दंड दोन महिन्यात फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. फिर्यादीस दंडाची रक्कम २ महिन्यात दिली नाही तर आरोपीस पुन्हा ६ महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीतर्फे अॅड. सचिन व्यवहारे यांनी काम पाहिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












